महाराष्ट्राच्या वाघाचा मध्यप्रदेशातही डंका #chandrapur #SudhirMungantiwar, #MadhyaPradesh, #speech

Bhairav Diwase
0

इंदौरच्या भाजप कार्यकर्त्यांना मुनगंटीवारांच्या भाषणाने घातली मोहिनी*


भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तृत्व शैलीने मध्यप्रदेशातील जनताही मोहित झाली आहे. पत्रकार परिषदेत दिलेल्या उत्स्फूर्त उत्तरांनी आणि प्रभावी वक्तृत्वाने मध्यप्रदेशातील इंदौर शहरात त्यांची चर्चा होती.

झाबुवा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना अक्षरशः संमोहित केले. "सुधीर भाई साहब ने तो कमाल कर दिया !", अशा प्रतिक्रिया उपस्थित प्रत्येक नेता आणि कार्यकर्त्यांकडून येत होती. इंदौर विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार, विविध आघाड्यांचे प्रमुख, लोकसभा प्रभारी, मीडिया सेलचे तरुण पदाधिकारी स्वतः भेटून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गराडा घालून भरभरून दाद देत होते. अनेकांना त्यांच्यासोबत "सेल्फी" काढण्याचा मोह आवरता आला नाही.

आमदार आकाश विजयवर्गीय, मंगला गौड, माजी आमदार गोपिकिशन नेमा, इंदौरचे महापौर, नगरसेवक आदी सर्व प्रमुख लोक दिवसभर सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत होते. ८ आणि ९ जून रोजी मध्यप्रदेशातील इंदौर आणि आणि रतलाम लोकसभा मतदार संघात "मोदी @9" या भाजपच्या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांमध्ये मंत्री मुनगंटीवार सहभागी झाले होते.

अभ्यासपूर्ण भाषण, विषयाची मुद्देसूद मांडणी आणि विरोधकांवर जोरदार प्रहार करण्याची क्षमता असलेले सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. भाऊ बोलणार, म्हटल्यावर विरोधकांची आधीच पाचावर धारण बसते. कागद, पुरावा आणि वस्तुनिष्ठता तपासल्याशिवाय बोलत नाही, हा भाऊंचा दंडक आहे. भारताच्या यशस्वी पंतप्रधानांनी नऊ वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मुनगंटीवार यांनी मध्यप्रदेशच्या जनतेसमोर मांडला.

मुनगंटीवारांनी जवळपास सर्व राष्ट्रीय योजनांचा, राष्ट्रहितकारी निर्णयांचा आणि जागतिक स्तरावर भारतमातेचा गौरव वाढेल यादृष्टीने नरेंद्र मोदी यांनी उचललेल्या प्रत्येक पावलांची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली. तेव्हा विलक्षण आत्मविश्वास आणि प्रखर राष्ट्रभक्ती त्यांच्या शब्दा शब्दांतून झळकत होती. पत्रकारांच्या उलट प्रश्नांना सुधीरभाऊंच्या उत्तरांनी अक्षरशः गारद केले.

कॉंग्रेस आणि भाजप ही तुलनाच होऊ शकत नाही हे पटवून सांगताना जी अफलातून उदाहरणे मुनगंटीवार देत होते. त्यानंतर इंदौरचा प्रत्येक पत्रकार आपसात चर्चा करत होता, " बडे दिनों बाद इंदौर ने ऐसी प्रेस वार्ता का अनुभव किया !", अशी चर्चा पत्रकारांमध्ये होती. त्यांनी दिलेले बिभीषणचे उदाहरण इतके हिट झाले की आमदार आकाश विजयवर्गीय यांनी जाहीर भाषणात त्याचा उल्लेख करत यापुढे प्रत्येक भाषणात मी ते वापरेल, असे सभागृहात सांगून टाकले.

पत्रकार परिषदेनंतर मांगलिया येथे भव्य लाभार्थी मेळाव्यात १० हजार लोक उपस्थित होते. तेथे मंत्री तुलसिराम सिलावट यांनी सुधीरभाऊंच्या कर्तृत्वाची आणि भाषणाची प्रशंसा करताना "महाराष्ट्र के भूषण" असा उल्लेख केला. त्यानंतर व्यापारी संमेलनात राष्ट्रीय महासचिव आणि मध्यप्रदेशचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी मंचावर येताच सुधीरभाऊंना जी कडकडून मिठी मारली, ते दृष्ट ती बघून सारेच अवाक झाले.

सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला; व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना मंत्री मुनगंटीवार यांनी दिलेली उत्तरे आणि मांडलेली भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. भाजपच्या संयुक्त मोर्चा अर्थात विविध आघाड्यांच्या मेळाव्यात सुधीरभाऊंनी कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे, हा विषय मांडत असतानाच उत्तम कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, हेदेखील उत्तम शैलीत सांगितले.

या संमेलनाला असलेल्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मुनगंटीवारांच्या भाषणाने प्रेरित झाल्या आणि उत्स्फूर्तपणे बोलू लागल्या. एकूणच या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कार्याची चर्चा करण्यासाठी, जनतेपर्यंत त्यांचा मनोदय आणि संकल्प पोहोचावा, यासाठी सुधीर मुनगंटीवार आमच्याकडे आले, याचं समाधान प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)