ग्रामीण रुग्णालयाचा गेट बंद; रुग्णांना नाहक त्रास #chandrapur #Korpana #Gadchandur

Bhairav Diwase
0

रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार?


कोरपना:- गडचांदुर येथील ग्रामीण रुग्णालय हे दोन तालुक्यातील मोठे रुग्णालय असून येथे शेकडो रुग्ण रोज ये-जा करतात अश्यातच अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने रुग्णालयाचा एक गेट बंद करण्यात आला आहे. त्यात रुग्णांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गंभीर रुग्णांना येण्यासाठी हा एक महत्त्वाचा गेट आहे. दुचाकीने व पायी येणाऱ्या रुग्णांसाठी महत्त्वाचा गेट मानला जातो. दोन दिवसापासून हा गेट बंद करण्यात आला असून रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर गंभीर रुग्णांना तिथून फेऱ्या मारत दुसऱ्या गेटने पोहोचावे लागत आहे. त्यात रुग्णांना काही बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण? अशा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

सविस्तर माहिती घेतली असता काही दिवसांआधी दोन-तीन कुत्र्यांनी रुग्णालयाच्या वसाहतीत जाऊन काही जणांना चावा घेतला याची सविस्तर माहिती नगरपरिषद ला दिली, मात्र नगर परिषदेने कोणतेही कारवाई केली नाही म्हणून तेथील अधिकाऱ्यांनी हा गेट कुत्रे व डुकरे येतात म्हणून बंद करण्यात आला असे सांगण्यात आले. मात्र कुत्रे व डुकरांसाठी गेट बंद करायचा हे कोणते कारण उद्या दुसऱ्या गेटमधून जर कुत्रे डुकरे आले तर तो सुद्धा गेट बंद करणार का असा प्रश्न नागरिकांनी केला तरी अधिकाऱ्यांना हा गेट तात्काळ सुरू करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
मी या गेट बद्दल तिथे उपस्थित डॉ. नाने यांना विचारले असता त्यांनी सांगितले की त्या गेट मधून कुत्रे व डुकरे येत असतात त्यामुळे तो गेट बंद करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिले. त्यांना लेखी काही आले का? असे विचारले असता त्यांनी सी. एस. साहेबांनी तोंडी सांगितले व दुसऱ्या गेट मधून जर कुत्रे डुकरे आले तर तो सुद्धा गेट बंद करणार असे उद्धटपणे बोलले तर मी त्यांना उद्याला गेट खुला करा असे सांगितले असून त्यांनी गेट न सुरु केल्यास आम्ही स्वतः जाऊन गेट सुरू करणार.
सतिश बिडकर प्रहार जनशक्ति पक्ष तालुका प्रमुख

https://youtube.com/@Adharnewsnetwork?feature=share7


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)