बोगस बियाणे, खतांची विकणाऱ्यांची खैर नाही! #Chandrapur #Mumbai #akola #Maharashtra #agriculture


बोगस बियाणे, खतांची विक्री करणाऱ्यांना १० वर्षांच्या शिक्षेचा कायदा करणार:- कृषीमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई:- राज्याच्या कृषि विभागाने अकोला जिल्ह्यासह राज्यात ८७ ठिकाणी बनावट व निकृष्ट दर्जाची औषधी, बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांविरोधात धाडसत्र राबवले असता, ६८ ठिकाणी अनियमितता आढळून आली.

⭕शेतकऱ्यांनो! ई-केवायसीची लगेच प्रक्रिया पूर्ण करा

व्यावसायिकांनी पेरणीपूर्वी बनावट बियाणे, खते व औषधींचा साठा नष्ट करावा, अन्यथा राज्यपालांकडे तक्रार करण्यासोबतच अशा व्यावसायिकांना किमान १० वर्षांची शिक्षा व्हावी, असा कठोर कायदा येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

🛑ई-केवायसी' कशी करायची माहितीयं का?

बनावट व निकृष्ट दर्जाची औषधी व बियाण्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर राज्यात ८७ ठिकाणी धाडसत्र राबवले. यामध्ये ६८ ठिकाणी अनियमितता आढळून आली. या धाडसत्रानंतर अधिकाऱ्यांवर आरोप झाले. व्यावसायिकांनी आरोप करण्यापेक्षा पोलिसांत तसेच लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रारी कराव्यात. त्याची शहानिशा केली जाईल. परंतु शेतकऱ्यांसाठी अशा आरोपांची पर्वा करणार नसल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ठणकावून सांगितले.

राज्यभरात धाडसत्र राबविण्याचा प्रस्ताव
शेतकऱ्यांच्या भविष्याची पर्वा न करता काही व्यावसायिक बनावट खते, बियाणांची विक्री करुन या व्यवसायाला बदनाम करत आहेत. मी राज्यपाल तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पोलिस, महसूल व कृषि विभागामार्फत संयुक्त धाडसत्र सुरु करण्याचा प्रस्ताव देणार असल्याचे कृषिमंत्री सत्तार यांनी सांगितले.

'लोकमत'चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच 'लोकमत' अकोला आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून राज्यपाल रमेश बैस, प्रमुख उपस्थिती म्हणून लोकमत समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, अध्यक्षस्थानी लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा तसेच समूह संपादक विजय बाविस्कर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत