लढवय्या व निर्भिड पत्रकार जीवनदास गेडाम

Bhairav Diwase
0

वैनगंगा न्यूज नेटवर्क या लोकप्रिय पोर्टलचे कार्यकारी संपादक जीवनदास गेडाम तालुक्यात निर्भिड पत्रकार म्हणून परिचीत आहेत.यासोबतच सोशलिस्ट व राजकीय पुढारी म्हणूनही त्यांची ओळख आहे.त्यांनी आपल्या तत्वाशी कधी तडजोडच केली नाही हा बाणा आजही कायम आहे तो शेवटच्या श्वासापर्यंत राहिल हे तेवढेच खरे आहे.धडाकेबाज,निडर, निर्भिड, निष्पक्ष,चौकस वृत्ती,भक्कम अनुभव,सशक्त विचार व पत्रकारितेचे सज्जड ज्ञान असलेला हा पत्रकार आजही पत्रकार म्हणूनच जगतोय.खरं तर जीवनदासची पत्रकारिता हा त्याचा श्वास आहे हे तितकेच खरे आहे.अनेकांना न्याय देण्यासाठी त्यांनी आपली लेखणी चालवली आहे.अनेकांच्या समस्या,अडचणी, न्यायासाठीची गुहार हि शासनदरबारी पोहचविण्यासाठी बातम्याच्या माध्यमातून आवाज उठविला आहे.अनेक प्रश्नांना त्यांनी न्याय दिला आहे.हि घोडदौड मागील तीस वर्षांपासून सुरू आहे.
अवघे बारावीचे शिक्षण पुर्ण केलेला हा संवेदनशील माणूस आजूबाजूची समस्या पाहून, दस्तुरखुद्द आपल्या जन्मगाव जुनगावचीच समस्या बघून राहावलं नाही म्हणून त्यांनी समाजसेवेच व्रत घेत पत्रकारितेतील ईनिंग सुरू केली.आधी सिस्टीमच्या विरोधात लढतांना त्रास झाला मात्र त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ते पुन्हा स्ट्राॅंग होत लढाई सुरूच ठेवली.तो लढतोय कुणालाही न घाबरता.यादम्यान एक संधी आली गावचं कारभार सांभाळण्याची ती संधी जीवनदासनी लिलया पेलली.निष्पक्ष असल्याने सरपंच म्हणून त्यांनी पाच वर्ष आपला कार्यकाळ पूर्ण केला.गावविकासासाठी ते झटले त्यांनी विकासात्मक कार्य केले.आनंददायी व प्रभावी शिक्षण पद्धतीला त्यांनी नेहमीच दुजोरा दिला. अतीशय मागास असलेल्या व शहरापासून अगदी अलग थलग असलेल्या दोन नदिच्या मधात वसलेल्या जुनगाव गावात त्यांनी विकासाचे काम करण्याचा सपाटा सुरू केला.पण त्यावेळी मिळणारी निधी अपुरी असल्यामुळे काही कामे मात्र होऊ शकली नाही हि खंत नक्कीच ते बोलून दाखवतात.
जीवनदास पुढे चालून राजकीय क्षेत्रात काम करू लागले.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांने ते प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला ते आजही शिवसेनेचे (आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे.शिवसेनेचे उपतालूका प्रमुख म्हणून काम केले असले तरी त्यांनी कधी ठेकेदारी केली नाही.आणि म्हणूनच आजही त्यांची आर्थिक स्थिती कमजोर आहे.जिवनदास नावाचा हा वाघ मात्र इतरांच्या समस्येसाठी लढतांना मात्र स्वताच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून बसला हे वास्तव आहे.
जीवनदास गेडाम हे सामान्य कुटुंबातील.घरी अठरा विश्व दारिद्र्य.दुसऱ्यांच्या समस्या सोडविण्याच्या नादात घराकडे दुर्लक्ष होत गेले.अनेक अडचणी उभे आहेत.ते लढत आहेत. पण कधी कधी आपली ताकत आता कमी पडतेय असं त्यांना वाटून जाते पण म्हणतात ना फायटर हा फायटरच असतो त्यातलेच जीवनदास हे एक आहेत.त्यांची फायटर स्पिरीट बघीतली की सलाम करावंस वाटते.एवढे आभाळाऐवढे समस्या असतांना व क्षणोक्षणी दुःख पदरात बांधुन असतांना हा माणूस कुणाकडेही गाऱ्हाणं करीत नाही किंवा भांडवलही करीत नाही.तो हरतोय कारण परिस्थिती त्याला हरवतेय म्हणून पण हे जरी खरं असलं तरी तो झुकलेला नाही,वाकलेला नाही,किंवा कुणाकडेही नतमस्तक झाला नाही.कितीही प्रसंग कठीण आले तरी तो हे करणारच नाही हा त्याचा न बदलणारा स्वभाव आहे.त्याच्याकडे पाहिलं की आपणही समस्याशी दोन दोन हात करण्यासाठी तयार आहोत हे सांगण्याची त्यांच्याकडून उर्जा मिळते. 

जीवनदास गेडाम म्हणजे पत्रकार आणि पत्रकार म्हणजे जीवनदास गेडाम हा साधा सरळ गणित आणि हिच त्याची ओळख.या तीस वर्षांत संधी मिळत गेल्याने अनेक वृत्तपत्रात काम केले.आजही करत आहेत.आता काळानुरूप पत्रकारितेतही बदल झाले आहेत आता त्याचे रुपडे डिजिटल पत्रकारितेची ओळख घेऊन आलेली आहे.यातही जीवनदास गेडाम यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.त्यांनी वैनगंगा न्यूज नेटवर्क व दरारा यासारखे पोर्टलचे संपादक म्हणून काम सुरू केले आहे.सोबतच वैनगंगा न्यूज नावाचे युट्यूब चॅनल सुरू केले आहे.जीवनदास गेडाम हे पत्रकारितेच्या प्रत्येक फ्रेम मध्ये फिट बसतात. कारण ते पत्रकारीता जगतात म्हणून.

जीवनदासचा दुसरा पैलू म्हणजे त्यांचं संगितावर असलेलं प्रेम.ते गीत संगिताचे दर्दी रसीक आहेत.त्यांना गाणी ऐकण्याची खुप आवड.वेळ मिळेल तेव्हा ते गाणी ऐकतात.एवढेच नव्हे तर ते गाणे गुणगुणतात.दुखावर मात करण्याची हि कला जीवनदास यांना फार छान जमलेली आहे. 

"ज़िंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है, 
थोड़े आँसू हैं, थोड़ी हँसी, आज ग़म है तो कल है ख़ुशी..."

-या गाण्यासारखं शब्द न शब्द जगणारा व लढवय्या पत्रकार म्हणून निर्भिड,निष्पक्ष पत्रकारिता करणाऱ्या पोंभूर्णा प्रेस ऑयकान जीवनदास गेडाम यांना ५६ व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....🎂🎂💐💐आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या जीवनासाठी,सुखासाठी, आयुष्यासाठी,आरोग्यासाठी, यशासाठी, स्वप्नपूर्तीसाठी खुप खुप सदिच्छा....


-सुरज गोरंतवार,पोंभूर्णा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)