Top News

अभाविप चंद्रपूर च्या मागणीला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरूंचा सकारात्मक प्रतिसाद #chandrapur #gadchiroli


चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे दि. 11 जुलै रोजी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे सर यांच्याशी गुरुनानक विज्ञान महाविद्यालय बल्लारपूर MSc. Chemistry (4th sem) च्या काही विद्यार्थ्यांचा निकाल विथहेल्ड (WLS) मध्ये असल्याने निकाल घोषित करणे आणि विविध अभ्यासक्रमांच्या परिक्षा निकालांचे पुनर्मूल्यांकनासंबंधित अडचणीवर विद्यापीठ अधिसभा सदस्य यश बांगडे यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर चे जिल्हा संयोजक शैलेश दिंडेवार, प्रसिध्दी प्रमुख अमोल मदने यांनी चर्चा केली आणि निवेदन दिले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. कावळे सर यांनी यांनी गुरुनानक विज्ञान महाविद्यालय बल्लारपूर च्या विद्यार्थ्यांचा निकाल विथहेल्ड (WLS) व पुनर्मूल्यांकनासंबंधित समस्या तात्काळ मार्गी लावल्या आणि परिक्षा निकालावर आक्षेप असलेल्या इतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय यादी उपलब्ध करुन देण्याची सुचना केली व सर्वोपरी सहकार्य करण्याचे आश्वस्त केले. त्या अनुषंगाने अभाविप चे अमोल मदने यांनी शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, चंद्रपूर च्या विद्यार्थ्यांची यादी मेलव्दारे कुलगुरू, प्र-कुलगुरू, परिक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक यांना पाठविले.

त्यावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी आक्षेप असलेल्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका पाहण्यासाठी गडचिरोली येथे विद्यापीठात आमंत्रित केले आहे. विद्यार्थी समाधानी नसल्यास तज्ज्ञांच्या माध्यमातून पुनर्मूल्यांकन करणार असल्याचेही त्यांनी नमुद केले. याकरिता तारिख लवकर कळविण्याची सुचनाही केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अशा सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करते की, तात्काळ आपण अभाविपचे चंद्रपूर जिल्हा संयोजक पियुष बनकर (मो. क्र. 9307127651) किंवा अमोल मदने (मो. क्र. 7741896906) यांना संपर्क करावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने