उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिशभाऊ वारजूकर यांच्या कडून परिवाराचे सांत्वन
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर
चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिंधीमाल येथे साप चावून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली कु. अप्सरा विलास सुतार असे मृत तरुणीचे नाव आहे रात्री ही तरुणी आपल्या घरी झोपून असतांना सादारंता ४ वाजताच्या सुमारास झोपेत असतांना तिला सर्पदंश झाला परंतु त्या वेळी तिला आपल्याला सर्पदंश झाले हे कडले नाही नंतर तिला खाटेवर काहीतरी आहे असे भास होताच तिला साप दिसला त्यावेळी सोबत तरुणीची आजी झोपलेली होती तिने आजीला साप चावेल या दृष्टीने आजीला खाटेवर साप असल्याचे सांगितलं व उठवलं काही वेळानंतर मुलीच्या प्रकृती बिगडत असल्याने सर्पदंश झाले असे लक्षात आले असता तिला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे नेण्यात आले प्रकृतीत सुदारना नसल्याने तिला ब्रम्हपुरी येथे नेत असतांना अप्सराची प्राण जोत मावळली एवढ्या कमी वयात तिच्या जाण्याने परिवारात व गावात शोककाळा पसरली.ही बाब उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ. सतिशभाऊ वारजूकर हे चंद्रपूर दौऱ्यावर असतांना चिंधीमाल येथील आशिष भाकरे यांनी घटनेची माहिती दिली असता भाऊंनी त्वरित चिंधीमाल येथे जाऊन परिवाराची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली परिवाराला सांत्वन केले व आर्थिक मदत दिली या वेळी, चिमूर विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष रोशनभाऊ ढोक, माजी नगरसेवक प्रतीक भसीन, माजी नगरसेवक संजय अमृतकर, वीलास येलशेटीवार,आशिष भाकरे,गिरीधर नन्नावरे, विकास सुतार अरविंद सुतार, सुरज तिवस्कर,, देवा सुतार,बळीराम माहुरे,,सदानंद तांदूळकर,सोमेश्वर माहुरे व गावकरी उपस्थित होते
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत