पोंभुर्ण्यातील युवकांचा मनसेत प्रवेश #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0
पोंभुर्णा:- वाढत्या बेरोजगारीने युवक वर्ग त्रस्त झालेले आहे. तेच हाल शेतकरी बांधवांचे सुध्दा आहे. सत्तेसाठी अलग अलग विचारांची नेते मंडळी एकत्र येऊन सरकार स्थापन करत आहेत. हे सर्व बघून सर्वसामान्य जनता संताप व्यक्त करत आहे.महाराष्ट्रातील गढूळ झालेल राजकारण बघता एक आशेच किरण म्हणून जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडे बघत आहे. हिंदूजननायक राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन पोंभूर्ण्यातील अनेक युवकांनी दि. 20/07/2023 ला मनसे मध्ये प्रवेश केला.


यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे, मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आकाश तिरुपतीवार, मनविसे तालुका अध्यक्ष आशिष नैताम, मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्रा. सदस्य विवेक धोटे, प्रकाश नागरकर, मयुर मदनकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. सदर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मनसे शहर अध्यक्ष निखिल कन्नाके व मनवीसे शहर अध्यक्ष पवन बंकावार यांच्या नेतृत्वात घेण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)