"त्या" जखमी वाघाचा शेवटी मृत्यू #chandrapur #pombhurna #tigerdeath


पोंभूर्णा:- मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर अंतर्गत येणा-या पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात वाघ (मादि) या वन्यप्राण्याचा आकस्मित मृत्यू झाल्याची घटना दि.२० जुलै गुरूवारला दुपारी ४ वाजता उघडकीस आली.

पोंभूर्णा वनपरीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या बेंबाळ परिसरात वाघ गावाजवळ असल्याची माहिती स्थानिक लोकांकडून प्राप्त झाली त्या आधारे स्थानिक वन कर्मचारी व वनमजूर यांनी मोक्यावर जावून पाहणी केली तेव्हा सकाळी वाघाचा वावर दिसून आला व वाघ जखमी असल्याचे दिसून आले होते.त्या आधारे तात्काळ चंद्रपूर येथील पशुवैद्यकिय अधिकारी यांना पाचारण करून वाघाची पाहणी करण्यात आली. गुरूवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास वाघाचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले.

सदरची घटना ही पिपरी दिक्षीत नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५४३येथे घडली आहे. वाघाच्या मृत्यूचे खरे कारण शव विच्छेदन अहवाल नंतर कळणार अशी प्रतिक्रिया पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी फणिंद्र गादेवार यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या