Top News

भाजपा कार्यकर्ते रेल्वे प्रवाशाच्या मदतीला धावले #chandrapur #ballarpur


बल्लारपूर:- गोरखपूर एक्सप्रेसने प्रवास करीत असलेल्या छत्तीसगडमधील खेळाडू पूजा सिंह यांची तब्येत अचानक बिघडली. तिला येथील रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. तिचे मदतीला भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे जिल्हा महामंत्री येथील सौरभ मेनकुदळे व त्यांचे सहकारी धावले. तिला चंद्रपूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्याकरिता त्यांनी सहकार्य केले. आता पूजाची तब्येत स्थिर आहे.
छत्तीसगडमधील महाविद्यालयीन खेळाडू आंध्र प्रदेशात तेथील हिरुडी या गावाकडे गोरखपूर गाडीने जात असताना त्यातील पूजाला अत्यवस्था वाटायला लागले. गोरखपूर गाडी बल्हारशाह स्थानकावर आज दुपारला आल्यानंतर येथे पूजा ला उतरविण्यात आल्यानंतर, तिला उपचाराची गरज असल्याची माहिती कळताच सौरभ व त्यांचे सहकारी शिवाजी चांदेकर आणि उज्वल कुठे हे तिच्या मदतीला धाऊन गेले.
तिला प्रारंभी येथे ग्रामीण रुग्णालयात त्यांनी दाखल केले. नंतर पुढील उपचारा करिता सौरभच्या मदतीने चंद्रपूरला रुग्णवाहिकेने येथून तिला, तिचे कोचसोबत रवाना करण्यात आले. त्यांनी केलेल्या या धडपडीचे येथे कौतुक केले जात आहे..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने