चंद्रपूर जिल्ह्यातील समाधान पूर्ती सुपर बझारात चोरी

बल्लारपुर:- बल्लारपूर पोलीस ठाण्यापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर असलेल्या समाधान पूर्ती बाजार येथे गुरुवारी रात्री चोरट्यांनी मॉलचे शटर तोडून अंदाजे एक लाख रुपये चोरून नेले.

बल्लारपूर शहरात गेल्या आठवड्यापासून पाउस शुरू आहे आहे.गुरुवारी रात्री देखील पाउस सुरु होता.मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना समाधान पूर्ती बाजाराचे शटर अर्धे उघडे दिसले. याची माहिती पोलिस स्टेशन ला देण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन टेंभुर्णे हे त्यांच्या पथकासह समाधान पूर्ती बाजार येथे पोहोचले आणि मॉलच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले,त्यात चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपये चोरून नेल्याचे दिसून आले. मॉलमधील सीसीटीव्ही कॅमेरेची तपासणी केली जात आहे

पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन टेंभुर्णे व त्यांचे पथक करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत