Top News

लालफितशाहीत अडकले पर्यटन? #Chandrapur #Korpana

७ कोटी खर्च करूण सुद्धा पर्यटकाच्या आनंदावर विरजण

कोरपना:- चंद्रपूर जिल्ह्यातील अति दुर्गम माणिकगड किल्ला डोंगर पायथ्याशी 1978 सालात निर्माण झालेल्या अमलनाला जलाशयाच्या लगत माजी आमदार संजय धोटे व तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून गडचांदूर पंचकोशीतील मानोली लगत पर्यटन विभागाच्या चांदा ते बांदा योजनेअंतर्गत नागरिकांची मागणी लक्षात घेता 2018-19 मध्ये गडचांदूर येथील परिसरातील औद्योगिक सिमेंट उद्योग कोळसा खाणी भागातील व जिल्ह्यातील एक आकर्षक निसर्ग रम्य डोंगर पायथ्याखाली भव्यदिव्य आमच्या व पर्यटकांना भुरळ घालायला असा पर्यटन केंद्र ज्येष्ठ तरुण व बालगोपालांना आनंद घेता यावा म्हणून शासनाने सात कोटी निधी खर्च करून सर्व सोयी सुविधा बगीचा यासह खेळणी साहित्य बांधकाम पूर्ण झाले असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत व पाटबंधारे विभागाच्या लालफितशाही अडवणूक कारभाराने लोक अर्पण होण्यास विलंब होत असून सदर बांधकामपूर्ण होऊन सुद्धा योग्य त्या कारवाईसाठी अडकले आहे.

 प्रशासनाने नागरिकांना तातडीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबीद अली यांनी केली असून15 ऑगस्ट पर्यंत नागरिकांसाठी खुले केले नाही तर 15 ऑगस्ट पासून नागरिक त्याचा वापर करतील असेही निवेदनात नमूद केले आहे पाटबंधारे विभागाने नागरिकांसाठी 15 ऑगस्ट पूर्वी अमल नाला पर्यटन केंद्र सुरू करावे अशी मागणी केली आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने