मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात मनसे उतरली रस्त्यावर

Bhairav Diwase
0


बल्लारपूर:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना बल्लारपूर विधानसभेच्या वतीने रविवार दि.23/07/23 ला मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात संताप व्यक्त करण्याकरिता एक निषेध आंदोलन करण्यात आले.महिलांच्या सुरक्षेवर सरकारने ठोस पाऊल उचलले पाहिजे,भविष्यात अशे कृत्य होऊ नये यांच्यासाठी घटनेत बदल करत महिलांना सुरक्षा दिली पाहिजे,केंद्र सरकार या घटनेची दखल घेतली पाहिजे या सर्व मागणी करत मणिपूर सरकार व केंद्र सरकारवर संताप व्यक्त करण्यात आले,बल्लारपूरच्या नगरपरिषद समोर डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळयासमोर निरदर्शने करण्यात आले.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील जिल्हा उपाध्यक्ष रिता बेंबन्सी यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले चंद्रपुर जिल्हाअध्यक्ष प्रतिमा ठाकूर,वाहतूक जिल्हा अध्यक्ष भरत गुप्ता सह जिल्हा उपाध्यक्ष माया ताई मेश्राम,जिल्हा सचिव मनीषा तोकलवार, तालुका अध्यक्ष कृष्णा सुरमवार,शहर अध्यक्ष वाणी सदालावार,शहर उपाध्यक्ष श्रुती बिस्वास,शहर सचिव माधुरी मेश्राम बल्लारपुरातील रेखा बेनी,बबिता बेनी,दिव्या सिंघेवार,सरिता बेंबन्सी,सोनपरी बेंबन्सी,रेहाना शाह,ज्योती घुंगणोत,लक्ष्मी राठोड,सीमा जैस्वाल,सुनीता जैस्वाल,प्राची पाल,रागिणी पाल,श्रेयांश ठाकूर,राकेश बहुरिया,रिषभ पेंदोर,जय ठाकूर,राहुल बेनी,रोहन पॉल सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)