बार मालकासह तिघांवर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल, आरोपींना अटक #chandrapur #arrested #durgapur

चंद्रपूर:- देशी दारू दुकानाच्या स्वच्छतागृहामध्ये चक्क भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून त्यांचा अवमान केल्याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी बार संचालकासह तिघांवर ॲट्रॉसिटी तसेच कलम 295-A, 34 अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र सिमरन देशी दारू दुकानातील स्वच्छतागृहात लावल्याची माहिती काही भीमसैनिकांना मिळाली. त्यांनी लगेच शहानिशा करण्यासाठी दारू दुकान गाठून तेथील स्वच्छतागृहाची पाहणी केली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असलेले बॅनर तेथे दिसून आले. त्यामुळे त्यांनी लगेच दुर्गापूर पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार केली. पोलिसांनी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून बार संचालकासह तिघांना अटक केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत