चंद्रपुरात पोलीस कर्मचाऱ्याने केली अल्पवयीन मुलीची छेडखानी #chandrapur #Chandrapurpolice

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरालगत (chandrapur City)असलेल्या एका भागात 2 जुलैला 2 जोडपे (couple) फिरायला गेले होते. मात्र त्याठिकाणी चारचाकी वाहनाने (Four wheeler) पोचलेल्या 5 युवकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला. (5 youths got drunk and rioted) त्यांना जोडप्यांना मारहाण करीत अल्पवयीन मुलीची छेड काढली. (They beat the couple and molested the minor girl.)


या घटनेत अल्पवयीन मुलीने तक्रार (A complaint by a minor girl) दिल्यावर एक पोलीस कर्मचारी सचिन बावणेसहित 5 जणांना अटक करण्यात आली आहे. (5 people including one policeman Sachin Bavane have been arrested.) त्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

ही 2 जोडपी मोटारसायकल (Motorcycle) उभी करीत त्यावर बसून होते. त्याचवेळी चंद्रपूरकडे जाणारं एक चारचाकी वाहन थांबलं. त्या वाहनामधील तिघांनी जोडप्यांमधील 2 मुलांना अश्लील शब्दात शिवीगाळ करत मारहाण (Abusing and beating with obscene words) करायला सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने मुली घाबरल्या. मारहाण करणारे युवक हे दारूच्या नशेत (Drunk) होते. मुलींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता आणखी एक चारचाकी वाहन घटनास्थळी आली. त्यामधील दोघांनी जोडप्यांना अश्लील शब्दात शिवीगाळ केली.

दारूच्या नशेत धुंद असलेला आरोपी हा पोलीस मुख्यालयात नोकरी करणारा C-60 मध्ये कार्यरत पोलीस कर्मचारी सचिन बावणे असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर चव्हाण कॉलनी रहिवासी संतोष कुशवाहा, महेंद्रसिंग सनोतरा, शंकर पिल्ले आणि संतोष कानके हे अन्य 4 आरोपी आहेत. त्यांची ओळख झालीय. जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी (District Superintendent of Police Pardeshi) यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी पोलीस कर्मचारी सचिन बावणे (Police employees Sachin Bawane) याला तात्काळ निलंबित (Suspended) केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)