Top News

अखेर गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला मिळाली मान्यता #chandrapur #gadchiroli


गडचिरोली:- जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर सरकारची मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होण्यासह जिल्ह्यातील आरोग्य समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. गडचिरोलीसह राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्न ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवार (ता. २८) मान्यता देण्यात आली. (Finally the medical college of Gadchiroli district got approval)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पालघर, ठाणे (अंबरनाथ), जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल.

आता पुन्हा ९ नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आल्याने सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मागील अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी जिल्हावासी करत होते. मुख्यमंत्री पदाची धुरा स्वीकारताच आपल्या पहिल्याच गडचिरोली जिल्हा दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीची घोषणा केली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने