शिवसेना बल्लारपूर विधानसभा प्रमुखपदी विनोद चांदेकर #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0

पोंभूर्णा:- शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेशाने पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांच्या अध्यक्षतेखाली हिराई गेस्ट हाऊस चंद्रपूर येथे जिल्हा आढावा बैठकीत शिवसेना बल्लारपूर विधानसभा प्रमुखपदी विनोद चांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी युवासेना कार्यकारणी महाराष्ट्र प्रदेश सदस्य हर्षल शिंदे,युवा सेना कार्यकारणी महाराष्ट्र प्रदेश सदस्य शुभम नवले, चंद्रपूर जिल्हा सह संपर्कप्रमुख बंडू हजारे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख योगिता लांडगे,युवा सेना जिल्हाप्रमुख सूर्या अडबाले, वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख अरविंद धिमान,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आशिष ठेंगणे,चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी सुधीर करांगल महापौर चंद्रपूर,पोंभूर्णा तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार,
यांची उपस्थिती होती.

जिल्हा आढावा बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाची सध्याची स्थिती जाणून घेवुन जिल्ह्यात शिवसेनेचा प्रचार व प्रसार कसा करता येईल व शिवसेना वाढीसाठी जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी विशेष लक्ष कसे देता येईल याबाबत मार्गदर्शन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून शासनाच्या विविध योजनेचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचे आव्हानही यावेळी करण्यात आले.या आढावा बैठकेत किरण पांडव यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत विनोद अशोक चांदेकर यांची शिवसेना बल्लारपूर विधानसभा प्रमुख पदी निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीने शिवसैनिकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)