Top News

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राजराजेश्वर मंदिरात अभिषेक #chandrapur #pombhurna


पोंभूर्णा:- पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे वाढदिवसाच्या निमित्याने दरवर्षी प्रमाणे महिला मोर्चाच्या वतीने अभिषेक करून भाऊंच्या निरोगी निरामय आयुष्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभावे आणि शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी त्यांनी जो वसा घेतला त्यासाठी त्यांच्या कार्याला अशीच बळ दे अशी पूजा अर्चना करीत विधिवत मंत्रोच्चर पद्धतीने राजराजेश्वर मंदिरात मनोभावे पूजा झाली.

यावेळी अल्का आत्राम प्रदेश महामंत्री, सुलभा पिपरे नगराध्यक्ष, वैशाली बोलमवार महिला शहर अध्यक्ष, श्वेता वनकर नगरसेविका, सुनीता म्यॅकलवार, मीरा मैदमवार, हिना बिश्वास, हर्षदा अडगुरवार, माया बोलमवार, नीता सिडाम, विद्या नीलमवार, अर्चना मडावी, शुभांगी मल्लेलवार, आशा मल्लेलवार, सविता सातपुते आणि सर्व कार्यकर्त्यां उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने