ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी वरून स्वगावाकडे जात असतांना मालडोंगरी ते रानबोथली रोडवर दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी 4 वाजताचे दरम्यान घडली असल्याची माहिती आहे.
मृतकाचे नाव रामचंद्र पांडुरंग मैंन्द (45) रा. चकबोथली (कसर्ला) तर जखमीचे नाव मोहन रामचंद्र सहारे (50) रा. काटली चक असे आहे. जखमीला ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक रामचंद्र उर्फ चंद्रा व मोहन ब्रम्हपुरीला कामा निमित्ताने आले होते. काम आटोपून आपल्या गावाकडे दुचाकीने जात असतांना दुचाकीला एका अज्ञात चारचाकी वाहनाने जबर धडक दिली ज्यात रामचंद्र याचा जागीच मृत्यू झाला, तर मोहन जखमी झाला.
रस्त्याने ये-जा करणाऱ्या परिचीत व्यक्तींनी जखमी इसमास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलीसांना दिली. सदर घटना स्थळी पोलीस पोहोचले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
#chnadrapurrain #rain #Talathi #Forest #police #news #udaanthecareeracademychandrapur #Adharnewsnetwork #bhairavdiwase #forestdepartment #Trending #Trendingnews #Women'sWorldCup
#JoeBurrow #UtopiaTravisScott
#Aliens #ShoheiOhtani #TylerChilders #RandyMeisner #Wordlehint #PostMalone #ZionWilliamson #NancyMace #Chivas #JalenRamsey #googleadsense #blogger #Sudhirmungantiwar #murder #accident #Rape #police #attack #maharashtra #india #manipur #sambhajibhide
कोणत्याही टिप्पण्या नाहीत