प्रशासकीय सेवेत येणाऱ्यांच्या जिद्दीसाठी उडानची नवी शाखा मातोश्रीजवळ #chandrapur #udaan

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- प्रशासकीय सेवेचे ध्येय उराशी बाळगून प्रयत्न करणाऱ्यांच्या जिद्दीसाठी एका छोट्याशा रुममध्ये सुरु केलेल्या उडान द करिअर ॲकाडमीने पाच वर्षात एक नवी उडान घेतली आहे. उडानने नवी कात टाकत आपल्या मार्गदर्शनाची शिदोरी घेऊन १० जुलैला नव्या शाखेचा शुभारंभ तुकूम परिसरातील मातोश्री शाळेजवळ सुरू केला आहे. उत्कृष्टतेचा परिचय असलेल्या उडान ॲकाडमीने नेहमीच विद्यार्थ्यांच्या यशासाठी बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. हि घोडदौड या निमित्ताने पुन्हा सुसाट वेगाने धावणार आहे.

उडाण हि अश्याच जिद्दीचे स्वप्न पाहणाऱ्या युवकाची ॲकाडमी आहे. पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा या जंगलव्याप्त छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे हा तरुण अनेक अडचणी, समस्यांचा सामना करून इंजिनिअरींगचं शिक्षण पुर्ण करून तो या क्षेत्राकडे वळला. इंजि. जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे यांनी स्वतः भोगलेल्या परिस्थितीचा विचार करून खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या होतकरू विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत रुजू होऊन सेवा करावी या उदात्त उद्देश्याने शेतकरी वडिलांचा मुलगा इंजि. जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे यांनी २०१८ मध्ये चंद्रपूर येथील तुकूम परिसरात एका छोट्याश्या रूम मध्ये UDAAN THE CAREER ACADEMY CHANDRAPUR या नावाचे स्पर्धा परिक्षा क्लासेस सुरु केले.
काही तरी साध्यचं करायचं आहे. हे व्रत घेऊन उडान घेतलेल्या इंजि. जितेंद्र पिंपळशेंडे यांनी अथक परिश्रम करून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले. अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत रूजू झाले. यावर्षी तर पन्नासच्या आसपास विद्यार्थी विविध क्षेत्रातील पदावर रुजू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढू लागला व पाहता पाहता क्लासरूम फुल होऊ लागले. क्लास रूम मध्ये विद्यार्थांना बसण्यासाठी जागा अपुरी पडू लागली. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये हि गोष्ट ध्यानात घेऊन प्रशस्त असलेल्या नविन क्लास रूमचे उद्घाटन दिनांक १० जुलै २०२३ रोज सोमवार ला मातोश्री शाळेजवळ, ताडोबा रोड, तुकुम, चंद्रपूर येथे करण्यात आले.हि उडाण अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन येणारी ठरणारी आहे.

संपर्क:- 
Er. Jitendra Pimpalshende sir
UDAAN THE CAREER ACADEMY CHANDRAPUR
Tukum Road Near Matoshree School Chandrapur
8806475060
8328608411
Welcome To UDAAN ACADEMY Chandrapur.
# एक नयी सोच के साथ नयी उडान....!
# Changing the way of learning.
# प्रत्येक रविवार ला महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर.
# 24 hours study room available.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)