ट्रकच्या धडकेने ओमनी कारचा चेंदामेंदा; चार जण ठार #Chandrapur #Yawatmal

Bhairav Diwase
0
यवतमाळ:- आज सकाळी ६ वाजेदरम्यान यवतमाळ येथे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एका अज्ञात वाहनाने ओमनी गाडीला समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखणी झाला होता. गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यंवतमाळच्या करंजीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कोठोडा गावाजवळ एका ओमनीला अज्ञात वाहनाने समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात घडला. ही गाडी वरोरा येथून वृत्तपत्र घेऊन पांढरकवडाच्या दिशेनं जात होती.


नागपूर येथून मराठी वृत्तपत्र पार्सल घेऊन जाणारी ओमनी कार आज सकाळी मारेगाव येथे वृत्तपत्र पार्सल देत पांढरकवडाकडे रवाना झाली. महामार्गावर असलेल्या कोठोडा पुलाजवळ समोरुन येत असलेल्या भरधाव ट्रकनं कारला जोरदार धडक दिली. या अपघातात ओमनीचा पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला. यात चालक, वाहक आणि दोन प्रवासी अशा चार चणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे.


या अपघातानंतर ट्रकसह चालक पसार झाला. पांढरकवडा पोलीस घटनास्थळी पोहचले. पुढील तपास करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)