शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा दमदार प्रिव्ह्यू रिलीज #jawan #movie #chandrapur


शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा दमदार प्रिव्ह्यू रिलीज झालाय. हिंदी ट्रेंडिंग चित्रपट जवानमध्ये शाहरुख जवान दमदार ॲक्शनमध्ये दिसतोय. ॲटलीने हा चित्रपट दिग्दर्शित केला असून गौरी खानची निर्मिती आहे.

प्रिव्ह्यूमध्ये शाहरुख खान एका सीनमध्ये आपल्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर पट्टी खोलताना दिसतोय. जेव्हा त्याचा बाल्ड लूक समोर येतो, तेव्हा तो खूप खतरनाक दिसतो. 'जवान' मधील शाहरुख खानची भूमिका अंगावर शहारे आणणारी असेल. असे म्हटलं जातं आहे.

याआधी चित्रपटाच्या पोस्टर्सने धुमाकूळ घातला होता. शाहरुख पूर्णपणे बँडेज आणि पट्ट्यांध्ये बांधलेला दिसला. जवान मध्ये शाहरुख खान चे दमदार डायलॉग बोलताना दिसतोय. शाहरुखचा एक डायलॉग आहे, 'जब मैं विलेन बनता हूं ना, तो मेरे सामने कोई हीरो टिक नहीं पाता है'.

७ सप्टेंबर रोजी रिलीज होणार 'जवान'

'जवान'मध्ये शाहरुख खानची दुहेरी भूमिका आहे. नयनतारा, प्रियामणि, सुनील ग्रोवर आणि विजय सेतुपतिदेखील दिसत आहेत. जवळपास २२० कोटी बजेटमध्ये हा चित्रपट तयार झालाय. परंतु, अन्य भाषांमध्ये भारतात रिलीज होईल. 'जवान' ७ सप्टेंबर रोजी थिएटर्समध्ये रिलीज होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या