वृक्षारोपण कार्यक्रमात सरदार पटेल महाविद्यालयाचा सहभाग


चंद्रपूर:- आजच्या काळात प्रदूषण आणि ग्लोबल वार्मिंगचा संभाव्य धोका टाळण्यासाठी वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन आणि वृक्ष संगोपन करून पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सरदार पटेल  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी येथे बोलताना केले.
 
सर्वोदय शिक्षण मंडळाद्वारे संचालित येथील सरदार पटेल महाविद्यालय, शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १० जुलै 2023 ला वृक्षारोपण कार्यक्रम शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय परिसरात पार पडला. त्यावेळी ते अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.

यावेळी गडचांदूर येथील शरद पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सिंग, शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एजाज शेख यांच्यासह चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे गितेश मुसंमवार, शुभम कोराम, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सरोजकुमार दत्ता, डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. वंदना खनके, डॉ. निखिल देशमुख शांताराम पोटदुखी विधी महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच चंद्रपूर शहर महानगरपालिकाचे कर्मचारी रसेयोचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संचालन व आभार डॉ. सरोजकुमार दत्ता यांनी केले. दरम्यान या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता साहिल चौधरी, क्रिष्णा भिसे, कु. शालिनी निर्मलकर, कु. नेहा भोमले, कु. श्रध्दा वर्मा यांनी अथक परिश्रम घेतले.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष मनोहर तारकुंडे, सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या