चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील नेत्ररोग तज्ञ डॉ. उमेश अग्रवाल यांनी आपल्या क्लिनिक मध्ये आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
चंद्रपूर शहरातील डॉ. उमेश अग्रवाल यांचा नेत्र दवाखाना आहे. रात्रौ 8:30 वाजताच्या दरम्यान क्लिनिक मधील रेस्टरूम मध्ये डॉ. अग्रवाल यांनी हेवी डोज चे इंजेक्शन घेतले होते.
डॉक्टरने इंजेक्शन घेतल्याची बाब ज्यावेळी उघडकीस आली तोपर्यंत फार उशीर झालेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्या कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत