शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्याला वाघाने उचलून नेले! #Chandrapur #chimur

2 तासांनी जंगलात सापडला मृतदेह
 
चिमूर:- बांधावर तुरी लावण्याकरीता पत्नीसोबत गेलेल्या एका 42 वर्षीय शेतकऱ्याला स्वत:च्याच शेतातून आज मंगळवारी दुपारच्या सुमारास वाघाने उचलून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

ही घटना तळोधी(बा.) वनपरीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नेरी वनक्षेत्रातील चिमूर तालुक्यातील सावरगाव शेतशिवारात आज मंगळवारी दुपारच्या सुमारास कक्ष क्र.1 मध्ये घडली.

पत्नी सुरेखाने पतीला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु जंगलाच्या दिशेने वाघाने तोंडात घेऊन गेल्याने जिव वाचवू शकली नाही. तब्बल दोन तासांनी पतीचा मृतदेह वनविभाग व गावाकऱ्यांचा हाती लागला आहे. ईश्वर गोविंदा कुंभारे असे मृतकाचे नाव असून तो चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या