चंद्रपूर जिल्ह्यात सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू #chandrapur #nagbeed

Bhairav Diwase
0

नागभीड:- वडिलांसोबत शेतात गेलेल्या एका विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना नागभीड तालुक्यातील ओवाळा येथे मंगळवारी घडली. अमित संतोष महाडोळे (वय १३, रा. ओवाळा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.


मंगळवारी सकाळी वडिलांसोबत तो शेतात गेला होता. शेतातील पाळीवर काम करीत असताना सापाने दंश केला. ही बाब त्याने वडिलांना सांगितली. त्याला लगेच तळोधी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अमितच्या अकाली मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)