रस्सीखेच स्पर्धेत सरदार पटेल कनिष्ठ महाविद्यालयाचे यश #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- २४ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युनिअर ( मूली ) रस्सीखेच स्पर्धेत सरदार पटेल कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपुर येथील खेळाडूंनी तृतीय क्रमांक प्राप्त केले. महाराष्ट्र राज्य रस्सीखेच संघटना अंतर्गत रस्सीखेच संघटना ऑफ़ छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) यांच्या वतीने आयोजित २४ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर महिला रस्सीखेच स्पर्धा नुकताच विभागीय क्रीड़ा संकुल गारखेड़ा, छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे आयोजित करण्यात आले होत.

सदर स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातुन ५६० खेळाडूंनी सहभागी झाले होते. या स्पर्धेत ज्यनियर मुलींच्या ४६० किलो वजन गटात सरदार पटेल कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपुर येथील खेळाडूंनी तृतीय क्रमांक प्राप्त करुन आपल्या चंद्रपुर जिल्ह्याचे व आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव लौकिक केले. सदर खेळाडूंना विभागीय क्रीड़ा संकुल गारखेड़ा येथे आयोजित बक्षिस समारंभात माजी आमदार शिव छत्रपती क्रीड़ा पुरस्कार कबड्डीपटू किशोर पाटिल विश्वस्त श्री. साईबाबा शिर्डी संस्थानचे सुहास आहेर, महाराष्ट्र राज्य रस्सीखेच संघटनेचे सचिव जनार्दन गुपिले यांच्या हस्ते पारितोषित देण्यात आली. या विजयामुळे सर्व खेळाडुंचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

सुरभी पारशीवे, मैथिली कायकर, आरुषी डोईजड, अंजली नागपुरे, नंदिनी लखनौवाले, पलक अलगुंडवार, गायत्री हजबन या खेळाडूंना प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून सरदार पटेल कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपुर येथील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा .विक्की तुळशीराम पेटकर व ईखलाक खा पठान यांचे मोलाचे मार्गदर्शक लाभले.

पदक प्राप्त खेळाडू छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे आपल्या खेळाचे प्रदर्शन करून चंद्रपूर येथे आपल्या महाविद्यालयात परतल्यानंतर खेळाडूच्या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्षा श्रीमती सुधाताई पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविन्द सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्री. सुदर्शन निमकर, सचिव श्री. प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष मनोहर तारकुंडे, सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरचे प्राचार्य डॉ. पी. एम.  काटकर, उपप्राचार्य डॉ. स्पप्निल मधामशेट्टीवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य           प्रा. चंद्रदेव जे. खैरवार, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. विक्की तुळशीराम पेटकर,             प्रा. राजकुमार चंद्रात्रे, प्रा. प्रमोद कुचनकार, प्रा. सुमेधा श्रीराम व महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुध्दा खेळाडूचे कौतुक करून अभिनंदन केले.