ब्रिजभूषण पाझारे यांनी केली वढा येथील पूर ग्रस्तांची पाहणी #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार माजला आहे. वढा हे गाव वर्धा - पैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर लागवडी खालील पिके पाण्याखाली लोटून गेली त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी माजी समाजकल्याण सभापती श्री ब्रिजभूषण पाझारे यांनी महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली वढा या गावाला भेट दिली.

वढा या गावाची प्रत्यक्षात पाहणी करता सर्वत्र नुकसानीचे पडसाद दिसून आले त्यावेळी श्री. पाझारे यांनी तहसीलदार साहेबांना परिस्थितीची माहिती देताच मा. तहसीलदार साहेब व गावचे तलाठी यांनी वढा गावाला भेट देऊन सर्व परिस्थितीची प्रत्यक्षात पाहणी केली व लवकरच याबाबत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असे सांगितले.

तसेच गावात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यापासून होणाऱ्या बिमाऱ्यावर आळा घालण्यासाठी मागील दोन दिवसांपासून बंद असलेले मलेरिया विभाग सुरू करून गा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)