Top News

एका तलाठीकडे 24 गावाचा कारभार #korpana


         
कोरपना:- कोरपना महसूल विभागामधील पारडी साजा क्र 7 व कोडशी साजा क्र 11 या दोन्ही साजाला एकच तलाठी कार्यरत असल्याने शेतकऱ्यांना सातबारा तसेच संबंधित कागदपत्रे वेळेवर मिळत नाही. तसेच पारडी साजा मध्ये 14 महसूली गाव असून अंदाजे अडीज ते तीन हजार खातेदार तसेच कोडशी साजा मध्ये 10 महसूली गावे असून तेवढेच खातेदार समाविष्ठ आहे त्यामुळे येथील तलाठी विरेंद्र मडावी याच्या अतिरिक्त कामाचा व्याप असल्यामुळे 24 गावाचा कारभार सांभाळता सांभाळता दमछाट होत आहे.


तसेच अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे काम सुरु असल्यामुळे दौऱ्यावर असतात त्यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजने साठी सातबारा पेरणी पत्रक तसेच आवश्यक कागदपत्रे वेळेवर मिळत नाही तसेच पिक विम्याची तारीख ची मुदत संपत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात आल्या पाऊली परत जावे लागत आहे. शेतीचा हंगाम सुरु आहे. शाळेच्या प्रवेशाचे सत्र चालू असून विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखले इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे, मात्र त्यांना सुद्धा तहसील कार्याल्यात चकरा माराव्या लागत आहे कोडशी साजाचे तलाठी सेवानिवृत्त झाले तेव्हा कोडशी साजा अतिरिक्त कार्यभार तलाठी विरेंद्र मडावी सांभालत आहे, मात्र दोन्हीही महसूली साजे मोठे व 24 गावे असल्याने साहजिकच कामाचा व्यापम मोठा आहे. शेतकरी व इतराची कामे वेळेवर होत नाही. त्यामुळे कोडशी साजा ला नवीन तलाठी नेमणूक करावी तसेच या गंभीर बाबीकडे लोकप्रतिधी तसेच स्थानिक प्रतिनिधी यांनी लक्ष देतील का? व शेतकऱ्याची अडचण दूर होईल का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने