Top News

अमल नाला धरण वेस्ट वेअर पर्यटकांसाठी खुले करा*


प्रहार चे बिडकर यांनी केली मागणी

कोरपना:- गडचांदूर शहराला लागून असलेल्या अमलनाला धरण दरवर्षी पर्यटकांसाठी खुले असतात व हजारो पर्यटक येथे आपला आनंद द्वीगुणीत करायला येतात. मात्र काही दिवसआधी एका तरुणाचा पाण्यात पोहताना मृत्यू झाला म्हणून वेस्ट वेअर हे पर्यटकानसाठी बंद करण्यात आले मात्र ते यावर उपाय नसून त्या ठीकाणी योग्य ती खबरदारी घेउन सुरु करायला पाहिजे अश्या आशयाचे निवेदन बिडकर यांनी संबंधित विभागाला दिले.
झीक झाक मध्ये कुणीही पाण्यात पोहणार नाही या साठी काही विशेष उपाययोजना व पोलीस बंदोबस्त करावा. झिक झाक च्या समोर पर्यटकांना पाहण्यास व आनंद व्यक्त करण्यास द्यावा दरवर्षी हजारो पर्यटक येतात त्याने आजूबाजूच्या व्यापारांना सुद्धा फायदा होतोअसे मत सुद्धा बिडकर यांनी व्यक्त केले.
एखाद्या रस्त्यावर अपघात झाला म्हणजे तो रस्ताच बंद केला जात नाही तर त्यावर योग्य त्या उपाययोजना केल्या जातात. अमलनाला धरण वेस्ट वेअर बंद करून अधिकार्याने मात्र आपली जबाबदारी झटकून टाकली. दोन वर्ष आधी असाच एक पाण्यात अपघात झाले असता तत्कालीन ठाणेदार आमले साहेब व जलसंपदा चे सय्यद साहेब यांनी योग्य उपाय योजाना करून दोन पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले त्यामुळे मागच्या वर्षी कोणताही अपघात झाला नाही त्याच प्रमाणे या वर्षी सुद्धा पोलीस विभागाने व जलसंपदा विभागाने योग्य उपाय योजना करून वेस्ट वेअर पर्यटकानसाठी खुले करायला पाहिजे असे सुद्धा बिडकर म्हणाले 

मा. आमदार साहेबांनी वेस्ट वेअर कडे पर्यटक येतात म्हणून तिथ पर्यंत रस्ता व पायर्यासुद्धा बनवल्या आहे आमदार साहेबाना सुद्धा पर्यटकान बद्दल आपुलकी आहे पण पोलीस विभाग व जलसंपदा विभागाने आपले हात वर उचलून पर्यटक व व्यापार्यांना वेठीस धरले यावर संबधित विभाग काय करणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने