चिमुर नगर परिषदेचे स्वच्छताकडे दुर्लक्ष #chandrapur #chimur

Bhairav Diwase
0
काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख
यांनी दिले मुख्यधिकरी यांना निवेदन
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर 
चिमुर:- नगर परिषद अंतर्गत येत असलेले 12 गावामध्ये नाली सफाई बरोबर होत नाही.कचरा गाडी पुर्ण पणे कचरा नेत नाही , आणि फोंगिग मशीन, याची धुरळणी बरोबर होत नसल्याने दिसून येत आहे तसेच दररोज सकाळी विध्यर्थी शाळेत जातात आणि नास्त्याचे दुकाने उघळतात व मोटर वाहन चालू होते त्यावेळी सफाई कर्मचारी आपले सफाई मुख्य मार्गावर सुरू करतात आणि 11 , 12 वाजे पर्यंत सफाई चालू राहते आणि त्यामुळे रस्त्यावर कचरा जमा राहतो पुर्ण साफाई होत नाही. आणि नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे स्वच्छता विभागातील सफाई कर्मचारी पहाटे 5 वाजता पासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णपणे रस्ता सफाई करण्यात यावी. आणि तसेच शहरातल्या नाल्या उपसा करणा सुरुवात केलेली आहे परंतु पूर्णपणे सफाई होत नाही अर्धी नाली उपसा होतो आणि अर्धी होत नाही ज्या नालीवर सामान असतात त्या सामनाला उचलत नाही. आणि पूर्णपणे उपसा करत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरल्याचे दिसून येत आहे तसेच सुरू असलेल्या पावसामुळे मच्छरांच्या प्रादुर्भाव वाढत असल्याने फोगिंग मशीनने नगर परिषद चिमूर अंतर्गत येत असलेल्या सर्व वार्डामध्ये धुरळणी करणे आवश्यक आहे.

 तसेच प्रत्येक प्रभागात काटेरी झाड खूप वाढलेली आहे.आहेत येण्या-जाण्यास अडचण निर्माण होत आहे. आणि त्या काटेरी झाडाच्या किणाऱ्याने पाणी साचून दुर्गंधी पसरली जाते तिथे डुक्कर आपले पिल्ले घेऊन असतात त्याचा विचार करण्यात यावे आणि कोर्टाकडून जवळील सार्वजनिक शौचालय बांधलेले आहे. परंतु वापरात येत नाही . कारण तिथे पाणी राहत नाही कुलूप लावून असते असे अनेक प्रकार आहेत करीता याकडे प्रशासन लक्ष द्यावे असे निवेदन काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी देले

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)