पोंभूर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील रामपूर दिक्षीत शेतशिवारामध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्याकाठावरील पाळ फुटल्याने रामपूर शेतशिवारातील सर्वे न. २००, २०४, २०५, २०६ या शेतजमिनीमध्ये नाल्याचे रूप तयार झाले आहे.आणि कोनामध्ये शेतात प्रचंड रेती साचल्याने पेरणी केलेले धानाचे रोपे दबल्याने शेतकयांचे फार नुकसान झाले.
नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांना पुराचा जबर तडाखा बसला.अंधारी नदीलाही तिन वेळा पुर आले होते.पाण्याचे स्त्रोत वाढल्याने रामपुर दिशीत येथील मामा तलावाची पाळ फुटली त्यामुळे सर्वे न. २००, २०४, २०५, २०६ या शेतामध्ये प्रचंड पाणी घुसल्याने शेतकयांचे धान रोपे वाहून गेले तर काही ठिकाणी रेतीच्या ढिगा-याखाली धान पऱ्हे दबून गेले आहे.धानाची रोपे नष्ट झाल्याने रोवणी करायची कशी असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
संबंधीत नुकसान ग्रस्त शेतकयांनी नुकसान भरपाईची मागणी केली त्या अनुषंगाने ग्रामसेवक,तलाठी,कृषी सहाय्यक यांनी मोका चौकशी करून नुकसानीची नोंद केली आहे. परंतु संबंधीत नाल्याची पाळ फुटून असल्याने जो पर्यंत ते पूर्ववत पाळ बांधण्यात येणार नाही शिवाय बांद्यामध्ये तिन ते चार फुट पडलेली रेती उचलणार नाही तोपर्यंत शेतकरी पेरणी करू शकणार नाही.त्यामुळे प्रशासनाने तातडीने नाल्याची पाळ,व रेती उचलून सहकार्य करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत