Top News

चिंतलधाबा येथे तृणधान्य जागरूकता कार्यक्रम #chandrapur


शिक्षक व विद्यार्थ्यांना तृणधान्याची मिळाली माहिती
पोंभूर्णा:- तालुक्यातील चिंतलधाबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य (मिलेट) याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोंभूर्णा मार्फत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना तृणधान्याची माहिती व्हावी,दैनंदिन आहारामध्ये त्याचा समावेश करण्यात यावा यासाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.

पोष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व,विविध तृणधान्य पिकांची ओळख प्रत्यक्ष विद्यार्थी व शिक्षक वृंद यांना देण्यात आली. तृणधान्यांमध्ये प्रामुख्याने ज्वारी,बाजरी,नाचणी,राळा, कोदो,हळवी,वरई,सावा इत्यादींचा समावेश होतो. या तृणधान्यांमध्ये विविध पोषक गुणधर्म असतात. तृणधान्यांमध्ये प्रथिने, खनिजे, तंतुमय पदार्थ व जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.तृणधान्यांच्या नियमित सेवनाने लठ्ठपणा, हदयविकार, मधुमेह, मोठ्या आतड्याचा कर्करोग इत्यादी धोके कमी करण्यास मदत होते. त्यासाठी दैनंदिन आहारामध्ये तृणधान्यांचा समावेश करणे गरजेचे आहे.असे मार्गदर्शन तांत्रिक कृषी सहायक सोनू गेडाम यांनी दिले.यावेळी चिंतलधाबा जिल्हा परिषद शाळेत शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने