Top News

टोकच्या समस्या जाणून घेण्यासाठी बिडिओ पोहचल्या गावात #chandrapur #pombhurna


दुषीत पाण्यासंबंधी करण्यात आले मार्गदर्शन

पोंभूर्णा:- पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळ्यात वैनगंगेच्या नदी पात्रातून पाणी आणण्यासाठी जीवघेणी कसरत करणाऱ्या टोकवासियांची माहिती मिळताच पोंभूर्ण्याचे गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोले या पिण्याच्या पाण्याची समस्या जाणून घेण्यासाठी टोक या गावात पोहचल्या होत्या.पावसाळ्यात नदीतील दुषीत पाणी न पिता व गावात असलेल्या पिण्यासाठी योग्य असलेल्या बोअरवेलचे पाणी पिण्याच्या संबंधाने मार्गदर्शन करण्यात आले.त्यांच्याकडून मिळालेल्या सुचनेनुसार गावकऱ्यांनी ते मान्यही केले.गटविकास अधिकारी यांनी टोक गावाला भेट देत सर्व समस्या जाणून घेतल्या.

पोंभूर्णा तालुक्याचे शेवटचे गाव असलेले गंगापूर व टोक वैनगंगा नदी व उपप्रवाहाच्या मधोमध वसलेले आहे.नदी असून सुद्धा पीण्याच्या पाण्याची मुबलक साधन नाहीत.येथे विहीर व हातपंप आहे पण क्षारयुक्त असल्याने पाणी पिले जात नाही असे गावकऱ्याचे म्हणणे आहे.त्यामुळे गावकरी दुरवर पैदल जावून वैनगंगा नदीचेच पाणी आणून पितात.पावसाळ्याचे दिवसात नदीचे पाणी पिल्याने गॅस्ट्रो सारखे आजार होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते हि गंभीर बाब लक्षात येताच गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोले यांनी गावात जाऊन गावकऱ्यांना दुषीत पाणी न पिण्याच्या संबंधित मार्गदर्शन केले.शुद्ध पाणी या गाववासियाना मिळावे यासाठी जल शुद्धीकरण यंत्र बसवून देण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

टोक येथील नगरिक पुरपरस्थितीतही नदीचे दुषीत पाणी पितात हे चुकीचे आहे.गावात विहीर व हातपंपातील पिण्यायोग्य असलेल्या पाण्याचा वापर करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. गावात जल शुद्धीकरणाच्या संबंधाने
तत्काळ उपाययोजना करण्यात येईल.
सुनीता मरस्कोले,
गट विकास अधिकारी, पं. स. पोंभूर्णा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने