Top News

कोविड-19 सानुग्रह अनुदान न मिळालेल्या नागरिकांनी संपर्क करण्याचे आवाहन #chandrapur


चंद्रपूर:- कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तिच्या जवळच्या नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबत महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने 26 नोव्हेंबर 2021 रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार कोविड -19 आजाराने मृत पावलेल्या व्यक्तिच्या जवळच्या नातेवाईकांनी केलेल्या अर्जाची तपासणी करून 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील काही अर्जदारांना कोविड सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी ज्या अर्जदारांना अद्यात सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळाली नाही, त्यांनी आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क करावा. अथवा जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 07172-251597 वर सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सचिव दगडू कुंभार यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने