आंदोलकांचा नागभीड-चंद्रपूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन #chandrapur #nagbeed

नागभीड:- चिमूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयास विरोध करण्यासाठी घोडाझरी तलावात जलसमाधी घेण्यास निघालेल्या शेकडो आंदोलनकर्त्यांना प्रशासनाने गेटवरच रोखले.परिणामी संतप्त झालेल्या आंदोलकांनी विविध घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला.नंतर रास्ता रोको आंदोलनही केले.

कोणतीही पूर्वसूचना न देता शासनाने चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू केले.आणि पदस्थापना केली. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही आणि सावली तालुक्याच्या वतीने संयुक्त कृती समिती स्थापन करून बुधवारी घोडाझरी तलावात जलसमाधी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.या आंदोलनासाठी शेकडो आंदोलक घोडाझरी तलावाच्या दिशेने आले.मात्र घोडाझरी गेटवरच या आंदोलकांना रोखण्यात आले.

आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करणार आहोत.आम्हाला तलावाकडे जाऊ द्या अशी विनवणी आंदोलकांनी उपस्थित असलेल्या तहसीलदार मनोहर चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पाठारे यांना केली.पण या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची ही विनंती झूगारून लावली. यानंतर घोडाझरी गेटवरच ठिया आंदोलन केले.या ठिय्या आंदोलनात चिमूर चिमूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाविरोधात घोषणा देवून शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

घोडाझरी तलावात अर्धजलसमाधी आंदोलन करण्यासाठी प्रशासनास विनंती करूनही प्रशासन बधले नाही.प्रशासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर - नागभीड हा राज्य महामार्ग आंदोलकांनी रोखून धरून चक्का जाम आंदोलन केले.या चक्का जाम आंदोलनामुळे या राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहणांची लांबच लांब रांग लागली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने