धान वाहून नेणारे ट्रक पलटल्याने वाहतूक खोळंबली #chandrapur #chimurचिमूर:- चिमूर कानपा मार्गावरील मेटेपार जवळ धान वाहून नेणारे ट्रक क्र. MH.34.AB.6114
हा ट्रक रस्त्यावर असलेल्या खड्ड्याने 3 ऑगस्ट रोज गुरुवारला सकाळी 7:30 च्या सुमारास पलटल्याने वाहतूक खोडंबली होती. दोन्ही बाजूने ट्रक आणि बस थांबलेली होती. बसमध्ये असलेले शाळकरी विद्यार्थी कर्मचारी तथा सामान्य नागरिक अडकून पडले.

तातडीने ट्रक बाजूला करून वाहतूक सूरळीत करण्याची मागणी नागरिक सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांना करीत होते. या मार्गांवर खड्ड्यामुळे वारंवार वाहतूक खोळंबते. यापूर्वीही तब्बल 4 तास खोळंबली होती. रस्त्यावरील असलेल्या खड्ड्याचा त्रास सामान्य नागरिकांना चांगलाच सहन करावा लागत आहे एवढे मात्र नक्की.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या