बस प्रवाशाचा प्रवासादरम्यान आकस्मिक मृत्यू #chandrapur #sindewahi


सिंदेवाही:- सावली तालुक्यातील बोरमाळा ते सिंदेवाही बस प्रवास करीत असलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा प्रवासा दरम्यान एस टी बसमध्येच मृत्यु झाल्याची घटना गुरुवार (दि. ३) रोजी सकाळी अंदाजे आठ वाजताच्या सुमारास उघड़कीस आली.

प्राप्त माहितीनुसार गुरुवार (दि. ३) च्या सकाळी सावली तालुक्यातील बोरमाळा येथून विहीरगाव-गेवरा-पाथरी मार्गे सिंदेवाहीकडे निघाली. दरम्यान विहीरगाव येथून गिरिधर काळे (७०) हे बसले. या बसमध्ये प्रवास्यांसह शाळकरी मुले, मूली सुद्धा प्रवास करीत होते. ही बस सकाळी अंदाजे ७.३० ते ८ वाजताच्या दरम्यान सिंदेवाही येथील बस स्थानकावर पोहचली.

या बसमधील सर्व प्रवासी सिंदेवाही बस स्थानकावर उतरले परंतु यातील एक वृद्ध प्रवासी खाली उतरला नाही. तो वृद्ध प्रवासी बसच्या सीटवर डोळे बंद करुन बसलेल्या अवस्थेत होता. ही बाब बसचे चालक व वाहक यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला झोपेतुन उठविण्याचा प्रयत्न केले असता, तो उठला नाही. त्यामुळे याची माहिती लगेच सिंदेवाही पोलिसांना देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी बस स्थानकावर पोहचुन रुग्णवाहिकेच्या मदतीने त्या वृद्धाला ग्रामीण रुग्णालयात पाठविले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे या वृध्द प्रवास्याचा मृत्यु हा बसमध्येच प्रवासादरम्यान झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या