जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले: विद्यार्थी थोडक्यात बचावले #chandrapur #nagbeed

Bhairav Diwase
0

नागभीड:- पंचायत समिती अतंर्गत येथ असलेल्या चिंधिचक जिल्हा परिषद शाळेचे छत दि. ३ ऑगस्टला सकाळी ८ वाजताच्या दरम्यान कोसळल्याने जिल्हा परिषद प्रथमिक शाळा बांधकामावर प्रश्न चिंन्ह निर्माण करून मुलांचे सुरक्षिततेसाठी त्वरीत उपाय योजना करण्यात यावे असी मागणी पालकांनी केली आहे.

दि. ३ ऑगस्टला चिंधिचक जि. प. शाळा सकाळची होती. त्यामुळे सकाळीच मुले, मुली शाळेत आले. याच वेळेस ८ वाजताचे दरम्यान सदर वर्गखोलीचे छत अचानक कोसळले मात्र मुलें मुली हे बेंचवर बसले नव्हते यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र जर मुले मुली जर वर्गात बसले असते तर मोठी हानी झाली असती असी भिती पालकांनी यावेळी व्यक्त केली. या वर्गाखोली मधे पाचवा वर्गातील मुले मुली शिक्षण घेत असतात.

सदर इमारत ही १० ते१५ वर्षापुर्वी ची बांधकाम केली असुन हे बांधकाम निकूष्ट दर्जाचे असल्याचा आरोप उपसरपंच प्रदिप समर्थ यांनी केला असुन या बाबतची तक्रार आज शिक्षणाधिकारी यांचेकडे करण्यांत आली असुन त्वरीत उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)