राजुरा येथे मुस्लीम समाजाच्या वतीने गणेश मंडळांचा सत्कार व केळी, पाणि बाॅटल वाटप.

Bhairav Diwase
0
राजुरा येथे मुस्लीम समाजाच्या वतीने गणेश मंडळांचा सत्कार व केळी, पाणि बाॅटल वाटप


राजुरा : शहरातून निघणार्‍या श्री गणेश विसर्जन मिरवणूकीचे औचित्य साधुन राजुरा मुस्लीम समाज बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक राजुरा येथे गणेश मंडळाच्या प्रमुखांच्या शाॅल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार व गणेश भक्तांना केळी,पाणि वाटप करण्यात आली.

दरवर्षी राजुरा शहरात मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांकडून श्री गणेश मूर्तीच्या स्थापना केल्या जातात व अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ढोल ताश्याच्या व विविध देखावे सादर करीत श्री गणेशाला निरोप देत असते. यावर्षी सुद्धा शहरात मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांचा सहभाग होता. शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या राजुरा शहरात ईद च्या दिवशी सर्व धर्मियांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देत एकतेचा संदेश दिला. तर दुसऱ्या दिवशी मुस्लीम समाजांनी गणेश मंडळांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या व गणेश भक्तांना केळी, पाणि वाटप करण्यात आली.

यावेळी नसीर उल्ला बेग, निजाम बुखारी, सैय्यद शहेजाद अली, बाबा बेग, ऐजाज अहेमद, शाहनवाज कुरेशी, रकीब शेख , शब्बीर पठाण, अब्दुल फारुखभाई, शहबाज कुरेशी, फारुख शेख, मतीन कुरेशी, आसीफ सैय्यद, मोहम्मद नाफे शेख, सैय्यद जाकीर, सालम चाउस, अब्दुल जुनेद, रियाज कुरैशी, वसीम शेख, मोहम्मद कबीर कुरैशी जियाऊल हक ,जावेद सिद्दिकि फिरोज शेख अशे अनेक मुस्लिम बांधवाचि उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)