मुख्याधिकाऱ्यांना दरवाज्यावरच केला घेराव
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर
चिमूर:- नगर परिषद क्षेत्रातील कवडसी रोडी येथील महिलांनी सकाळी ९ वाजता एकत्र येत नगर परिषद वर धडक देऊन ठिया आंदोलन करीत वार्डातील समस्येला वाचा फोडली. यावेळी महिलांनी नगर परिषद मुख्यधिकर्याना दरवाज्यावर रोखून आत मध्ये जाण्यास मज्जाव केला होता.
चिमूर शहर हे उमा नदीच्या तीरावर वसले असून. नदीच्या पलीकडील असलेले कवडसी रोडि है गाव नगर परिषद क्षेत्रात जोडल्यामुळे कवडसी रोडी है गाव चिमूर शहरातील वॉर्ड महणून समाविष्ट झाला पण समस्या जैसे थे राहिल्या. शहरात जाण्यासाठी नागरिकांना जाणे येनेकरिता उमा नदी ओलांडून जावे लागत असल्यामुळे नदीवर पुलीया बांधकाम करण्यात यावा. नदीतून जाण्या येण्याच्या मार्गावरच अवैध रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे रेती तस्करांच्या बंदोबस्त करावा.रस्त्यावरील अनावश्यक झाडे तोडून स्ट्रीट लाईट बसविण्यात यावे या मागणीसाठी रेती उत्खनन करणाऱ्या गद्याना घेऊन कवडसी येथून मोर्चा नगर परिषद कार्यालय येथे आणण्यात आला. महिलांनी कार्यालय समोरच ठीया आंदोलन केले. यावेळी नगर परिषदच्या मुख्याधीकारी सुप्रिया राठोड यांना कर्यालायाच्या आत मध्ये जाण्यास मज्जाव केल्यामुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक मनोज गभणे यांचे मार्गदर्षनात सहायक पोलिस निरीक्षक चावरे. पोलिस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम पोलिस तफ्यासहित घटनास्थळी दाखल झाल्या व परिस्थिती नियंत्रणात आली.