मराठवाडा, विदर्भाला 'नमो किसान'चा फायदा #chandrapur #Mumbai #gadchiroli


मुंबई:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीत गुरुवारी राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याची जी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली, त्यात सर्वाधिक लाभ हा मराठवाडा आणि विदर्भाला मिळाला. कोकणातील जिल्ह्यांना सर्वांत कमी लाभ मिळाला. मराठवाड्यात सर्वाधिक निधी बीडला मिळाला.


जिल्हावार वाटपाची आकडेवारी बघता अहमदनगर (१०३.५२ कोटी) अव्वलस्थानी आहे. सर्वांत तळाला ठाणे (१३.६७ कोटी) जिल्हा आहे. अहमदनगरमधील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे ५ लाख १७ हजार ६११, तर सर्वांत कमी ठाणे जिल्ह्यातील ६८ हजार ३६७ आहे. चार लाखांवर लाभार्थी असलेल्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर (४,५४,०४०) आणि कोल्हापूरचा (४,०६,२४०) समावेश आहे.

जिल्हावार निधी (आकडे कोटी रुपयांमध्ये)

अहमदनगर १०३.५२, अकोला ३७.५६, अमरावती ५३.१८, छत्रपती संभाजीनगर ६५.३७, बीड ७७.९१, भंडारा ३७.२१, बुलडाणा ६६.३८, चंद्रपूर ४३.३२, धुळे २८.४९, गडचिरोली २५.९३, गोंदिया ४२.४८, हिंगोली ३६.१२, जळगाव ७५.९१, जालना ५७.९५, कोल्हापूर ८१.२५, लातूर ५३.४६, नागपूर ३०.०८, नांदेड ७५.४८, नंदुरबार १९.३२, नाशिक ७७.०७, धाराशिव ४२.२८, पालघर १६.०७, परभणी ५३.४२, पुणे ७७.९७, रायगड १९.६५, रत्नागिरी २५.५२, सांगली ७७.४४, सातारा ७८.६७, सिंधुदुर्ग २१.६२, सोलापूर ९०.८१, ठाणे १३.६७, वर्धा २४.६८, वाशिम ३०.८१, यवतमाळ ५५.४३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या