Click Here...👇👇👇

नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ #chandrapur #nagpur #chandrapurpolice

Bhairav Diwase


चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने पटकाविले जनरल चॅम्पियनशिप


चंद्रपूर:- दिनांक 4 ऑक्टोंबर, 2023 ते 8 ऑक्टोंबर, 2023 दरम्यान नागपूर ग्रामीण येथे आयोजित नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-2023 मध्ये सहभागी चंद्रपूर जिल्हयासह नागपूर ग्रामीण, भंडारा, वर्धा, गोंदिया आणि गडचिरोली अशा एकुण 6 जिल्हयातील एकुण 840 पोलीस खेळाडुंनी सहभाग घेवुन विविध कीडा प्रकार ज्यामध्ये 7 सांघीक खेळ फुटबॉल, बॉस्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, कबड्डी, खो-खो आणि हाकी तसेच वैयक्तिक खेळ अॅथलेटिक्स, क्रॉस कंट्री, वेटलिफ्टींग, पॉवरलिफ्टींग, स्वीमींग, कुस्ती, जुडो, बॉक्सींग, तायक्वांडो, वु-शो अशा एकुण 17 खेळ प्रकारात 6 ही जिल्हयातील पोलीस खेळाडुंनी अतिशय खेळमेळीचे वातावरण संपुर्ण क्रीडा स्पर्धा पार पाडली असुन या मध्ये चंद्रपूर जिल्हयातील पोलीस खेळाडुंनी फुटबॉल, हॉकी, कबड्डी, बॉस्केटबॉल आणि वेटलिफ्टींग, पॉवरलिफ्टींग, बॉक्सींग, कुस्ती, वुशो, तायक्वांडो या खेळ प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करुन महिला आणि पुरुष या दोन्ही जनरल चॅम्पियनशिप चे मानकरी ठरले आहेत.



पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु पोलीस उपअधिक्षक श्रीमती राधीका फडके यांचे मार्गदर्शनात आणि पोलीस निरीक्षक श्री रोशन यादव, राखीव पोलीस निरीक्षक श्री किसन नवघरे आणि टिम कप्तान सहा.पोलीस उपनिरीक्षक श्री चंद्रकांत पेद्दीलवार यांचे नेतृत्वात चंद्रपूर जिल्हयातील 140 पोलीस खेळाडुंनी वरील नमुद विविध कीडा प्रकारात आपले नैपुण्य प्रदर्शित करुन मागील 5 वर्षापासुनची चॅम्पियन परंपरा टिकवुन या वर्षीही असे एकुण 6 वेळा महिला व पुरुष या दोन्ही गटात परिक्षेत्रीय चॅम्पीयनशिपचे मानकरी ठरले.



यावर्षीची नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा ही श्री छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र नागपूर यांचे मार्गदर्शनात व देखरेखीत नागपूर जिल्हयात पार पडली आहे.



श्री छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र नागपूर आणि श्री संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक, नविअ नागपूर यांचे शुभहस्ते महिला व पुरुष जनरल चॅम्पीयनशिप विनर ट्रॉफी पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांना प्रदान करण्यात आलेली आहे.



या परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणारे पोलीस खेळांडूची निवड माहे जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धासाठी झालेली आहे.


नागपूर परिक्षेत्रीय पोलीस कीडा स्पर्धा 2023 मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्यामुळे पोलीस अधीक्षक श्री - रविंद्रसिंह परदेशी यांनी सर्व खेळांडूचे अभिनंदन करुन अखिल भारतीय पोलीस कीडा स्पर्धा मध्ये पदक प्राप्त केलेले मपोअं अमृता चकरे (वेटलिफ्टींग), मनापोअं प्रिती बोरकर (दु-शो), पोअं. प्रविण रामटेके (कराटे), पोअं अभिषेक आडे (कराटे), पोअं प्रविण भिवगडे (हॉकी) यांचे सुध्दा अभिनंदन करुन सत्कार करुन त्यांना गौरविण्यात आले.


चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाचे मागील 6 वर्षापासुन महिला आणि पुरुष या दोन्ही गटातील जनरल चॅम्पीयनशीप पटकाविण्याचा मान आपल्याकडे राखुन ठेवला असुन याचे सर्वस्वी श्रेय जिल्हा प्रमुख पोलीस अधीक्षक व इतर वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस खेळाडु यांना जातो.