"त्या" तरुणाचा दोन दिवसानंतर सापडला मृतदेह #chandrapur #gadchiroli #Chamorshi


चामोर्शी:- वैनगंगा नदी पात्रात बुडून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसानंतर सापडला आहे. करण गजानन गव्हारे (वय 25) असे मृत तरुणाचे नाव आहे. करण हा चामोर्शी तालुक्याच्या कुनघाडा-डोनाळा घाटावरील वैनगंगा नदी पात्रात 13 नोव्हेंबर रोजी पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता.


चामोर्शी पोलिस आपत्ती व्यवस्थापन चमूसह त्याचा शोध घेत होते. अखेर दोन दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला. तळोधी परिसरातील वैनगंगा नदीत त्याचा मृतदेह आढळून आला.

सोमवारपासून वैनगंगा नदीत बोट व ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला जात होता. 15 नोव्हेंबरला पहाटे एका मच्छिमाराला तळोधी नदी परिसरात मृतदेह आढळला. त्याने याबाबत माहिती दिल्यानंतर मृतदेह करणचाच असल्याची खात्री करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, चामोर्शी तालुक्याच्या कुनघाडा रै. येथील युवक करण गव्हारे हा दिवाळी सणानिमित्त एटापल्लीहून त्याच्या गावी कुनघाडा रै. येथे आला होता. तो आपल्या मित्रांसोबत वैनगंगा नदीघाटावर आंघोळ करण्यासाठी गेला होता. यावेळी तो खोल पाण्यात बुडाला.

दरम्यान, चामोर्शी रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. करण आईवडिलांसाठी एकुलता होता. त्याच्या पश्चात आईवडील, एक विवाहित बहीण, आजी-आजोबा आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या