Top News

.....त्या खाकीतल्या अधिकाऱ्यांने माणुसकी जोपासली! #Chandrapur #police #chandrapurpolice


आंदोलनातील २६ आंदोलनकर्त्यांना जेवण व प्रवासाची केली व्यवस्था

पोंभूर्णा:- तालुक्यातील आदिवासी बांधवांचे विविध मागण्यांना घेऊन पोंभूर्णा पोलिस स्टेशन समोर दोन दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू होते.तिसऱ्या दिवशी बुधवारला दुपारी पोलिसांनी आंदोलन हाणून पाडत ३० लोकांना ताब्यात घेतले होते.पुढील कार्यवाहीसाठी त्यांना मुल येथील न्यायालयात हजर करण्यात आले.यातील २६ जणांची जमानत झाली.मात्र उशीरापर्यंत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने रात्रीचे दहा वाजले होते.त्यामुळे मुल येथील ठाणेदार सुमित परतेकी यांनी मानव सेवा म्हणून २६ जणांना ठाण्यात भोजनाची व त्यांच्या गावी सोडून देण्याची सोय केली.

पोलिस म्हणजे वर्दीतील कठोर माणूस अशीच ओळख सर्वश्रुत आहे.मात्र यापलीकडे माणुसकी जिवंत आहे याचेच उदाहरण बुधवारला रात्री मुल पोलिस स्टेशन मध्ये अनुभवायला मिळाले. पोंभुर्णा पोलिस स्टेशन समोर असलेल्या ठिय्या आंदोलनातील १९ महीला व ७ पुरूष असे २६ लोकांना मुल न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रियेला १० वाजले होते.या सर्व महीला व पुरुषांना आपापल्या गावी जाण्यासाठी अडचण झाली होती.त्यांची अडचण बघून चंद्रपुर जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी ठाणेदार सुमित परतेकी यांना २६ लोकांना जेवणाची सोय व गावी सोडून देण्याची सुचना केली.रात्रीची वेळ व उपाशी असलेले २६ ही लोकं उपाशी असल्याची जाणीव ठेवत उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे,मुल पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुमित परतेकी, पोंभूर्णाचे ठाणेदार मनोज गदादे, पोलिस उपनिरिक्षक संतोष येनगंदेवार व पोलिस कर्मचारी यांनी रात्री दहा वाजताच्या दरम्यान मुल पोलिस ठाण्यात भोजनाची व्यवस्था केली व त्या २६ लोकांना आपापल्या गावी सोडून दिले.या कृतीमुळे मानव सेवा परम सेवा हा परिपाठ खाकीतल्या माणसाने घडवून आणले असल्याचे उदाहरण या निमित्ताने पाहायला मिळाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने