विरूर स्टे. तेलगू जिल्हा परिषद येथे विद्यार्थ्यांनी केली मकरसंक्रांत साजरी

Bhairav Diwase
0

राजुरा:- मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांसोबत मकरसंक्रांत साजरी केल्यामुळे विद्यार्थ्यांत आनंद ही आनंद झाला. राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे तेलगू जिल्हा परिषद येथे नवीन रजू झालेले मुख्याध्यापक रामचंद्र पाला यांनी स्वतः मुलानं साठी सेमी इंग्रजी चे पूर्ण शिक्षण देत असून मुलानं मध्ये शिक्षणा ची बदल करून उच्च श्रेणी चे देत असून विद्यार्थांसोबत स्वतः विद्यार्थी बनून त्यांच्या सोबत मकरसंक्रांत आपल्या शाळेत विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. हा दृश्य पाहून गावकरी लोकात मुख्याध्यापक श्री रामचद्र पाला सर यांच्या बद्दल अधिक अभिमान वाढला असे दिसून येते आहे.

रामचंद्र पाला सर यांच्या सुंदर योगदान साठी सध्या गावकरी मंडळी व व्यापारी, पत्रकार बंधू व शाळा कमिटी चे अध्यक्ष, सदस्य या सर्वांनी शाळेचे प्रगती साठी सर्वानी आप आपले योगदान देत असून शाळेच्या विद्यार्थांसाठी पुन्हा काही वेगळे नियोजन करण्याचे प्रयत्न करीत आहे‌. शाळेच्या विद्यार्थांना शिक्षणासाठी व वेगवेगळे नियोजन साठी गावकरी, व्यापारी व पत्रकार बंधू व शाळा कमिटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य नी मुख्याध्यापक रामचंद्र पाला सर यांना व सर्व शिक्षकाला शुभेच्या दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)