सरदार पटेल महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न National Service Scheme Camp of Sardar Patel College concluded

Bhairav Diwase
0


शिबिरातून निरोप घेताना स्वयंसेवकांना अश्रू अनावर

चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे वरुर रोड ता. राजुरा येथे शिबिर आयोजित करण्यात आला होता. दि. १३ जानेवारीला राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोपीय समारंभ आयोजित केला होता.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, विशेष अतिथी वरुर रोड ग्रामपंचायत सरपंच गणपत पंधरे, पोलीस पाटील बंडू भोंगळे, रा. से. यो विभागीय समन्वयक डॉ. उषा खंडाळे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोंड, डॉ. वंदना खनके, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखील देशमुख, डॉ. राजकुमार बिरादार उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन करताना पुरुषोत्तम माहोरे म्हणाले की, या शिबिरात रस्ता सुरक्षा व वाहतूकीचे नियम, सायबर सुरक्षा, आरोग्य तपासणी शिबिर, जल संवर्धन, रोजगार, स्वयंरोजगार व करिअर मार्गदर्शन, शासकीय योजनेची माहिती या विषयावर वक्त्यांनी आपल्या भाषणातून स्वयंसेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच गावात कुष्ठरोग , जल संवर्धन, व्यसनमुक्ती या विषयावर पथनाट्य व जनजागृती करण्यात आली. तसेच "विद्यापीठ आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत गावातील समस्यांचा सर्वेक्षण करण्यात आले. स्वयंसेवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.



यावेळी स्वयंसेवकांना सरपंच गणपत पंधरे, अध्यक्षीय भाषणातून डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यांनी स्वयंसेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले तर रोशन चौधरी, मंजिरी सावरकर, श्रृती खाडे, मयुरी झगडकर स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले.


अध्यक्षीय भाषणात डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार म्हणाले की, अलीकडच्या काळात समाजात वेगवेगळ्या विचित्र घटना घडताना आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत आजचा तरुण कुठे तरी भरकटत जाऊ नये म्हणून राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमातून समाजपरिवर्तन करण्याचे कार्य आज राष्ट्रीय सेवा योजनेचा तरुण करीत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय, उद्दिष्टे, ब्रीदवाक्य व बोधचिन्ह हे या उपक्रमाचे स्वरूप आणि कार्य स्पष्ट करतात. स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्यशिक्षण हे सर्व स्वयंसेवकांमध्ये रुजविण्यात राष्ट्रीय सेवा योजना यशस्वी झाली आहे. समाजात सामाजिक जाण देणारा, जनजागृती करणारा, तसेच राष्ट्र व समाजाप्रती जबाबदारीचे कार्य करणारा राष्ट्रीय सेवा योजना हा भारत सरकारचा अभिनव उपक्रम आहे.


उठे समाज के लिए उठे उठे

जगे स्वराष्ट्र के लिए जगे जगे

स्वयं सजे वसुंधरा संवार दे

स्वयं सजे वसुंधरा संवार दे..


याच गाण्यांनी सकाळची झोप उघडायची..



या शिबिराचे संचालन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. राजकुमार बिरादार, प्रास्ताविक व अहवाल वाचन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. पुरुषोत्तम माहोरे तर आभार रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोंड यांनी केले.


शिबिराच्या यशस्वीतेसाठी रा. से. यो विभागीय समन्वयक डॉ. उषा खंडाळे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोंड, डॉ. वंदना खनके, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखील देशमुख, डॉ. राजकुमार बिरादार, दशरथ कामतवार, अमर भाऊ, शशीकला पारधी, इजाज शेख, सुरज बोरघरे, रुचिता टोकलवार, राणी गोंड, दर्शन मेश्राम, भैरव दिवसे, मुबारक शेख, साहिल चौधरी, शालिनी निरमलकर, समिक्षा कुरेकार यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)