ताडोबाच्या जंगलात मुक्त करणार 7 जटायू पक्षी:- वनमंत्री मुनगंटीवार #chandrapur

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- श्रीराम जन्मभूमी येथे अयोध्येत रामरायांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे या पार्श्वभूमीवर रामायणात उल्लेख असलेल्या जटायू अर्थात गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने ताडोबा जंगलातील झरी परिसरात जटायु मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान सांस्कृतिक कार्य विभागाकडून 21 आणि 22 ला आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन चंद्रपूर येथे केले गेले आहे. श्रीरामजन्मभूमी स्थळी उभारलेल्या भव्य दिव्य मंदिरात श्री रामललाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी पवित्र अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. संपूर्ण विश्व या ऐतिहासिक क्षणाची वाट बघत असताना चंद्रपूर शहर आणि जिल्हा देखील तयारीला लागला असून 21 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता झरी येथे 7 जटायू ताडोबात मुक्त केला जाणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून 21 आणि 22 ला आकर्षक कार्यक्रम आहेत. सुप्रसिद्द अभिनेता पुनित इस्सर (महाभारतातील दुर्योधन) यांच्या रामायण या नाटकाचा प्रयोग दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. हे नाटक अति भव्य स्वरूपाचे असून यामध्ये 50 पेक्षा जास्त कलाकार काम करत आहेत. रामायणातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगावर आधारित हे नाटक आहे. मुख्यतः राम आणि रावण यांच्यामधील संवाद व संघर्ष यामध्ये ठळकपणे दिसून येतो.

आगामी 22 जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणात येणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सुभाष नकाशे हे दीडशे ते 200 कलाकारांना घेऊन रामायण संबंधित सादरीकरणे करणार आहेत. यामध्ये नृत्य, नाट्य, गीत गायन, वादन यांचा समावेशt असणार आहे. गदिमा व बाबूजी यांच्या अविष्कारातून साकार झालेल्या गीत रामायण मधील काही गाणी व त्यावर आधारित सादरीकरणे ही यावेळेस अनुभवता येणार आहे. प्रभू रामाशी संदर्भातील गाणी आणि गीत रामायणातील काही महत्त्वाची गीते घेवून व रामायणातील काही प्रसंगावर आधारित प्रसंग सादरीकरण होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)