चंद्रपूर:- चंद्रपुरात पतंग पकडण्याच्या नादात घराच्या स्लॅबवरून पडल्याने एकाचा मृत्यू झाला. आनंद विठ्ठल वासाडे (43) असे मृतकाचे नाव आहे. ते भानापेठ वॉर्ड येथे राहत होते.
रविवारी सकाळी आनंद वासाडे हे घराच्या स्लॅबवर उभे होते. त्यावेळी एक पतंग कटलेली त्यांना दिसली. ती पतंग पकडण्यासाठी ते खाली उडी मारली. मात्र, स्लॅबवरून तोल गेल्याने ते खाली पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली.
बेशुद्ध अवस्थेत त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.