प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीराम फायनान्स येथे रक्तदान शिबिर संपन्न.

Bhairav Diwase
0


राजुरा:- श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा राजुरा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबीरचे उद्घाटन युनिव्हर्सल पिस फाउंडेशनचे सचिव श्री शारिक शेखच्या हस्ते करण्यात आले. 

रक्ताचा तुटवडा नेहमीच असतो जो पर्यंत कुणाच्या नातेवाईकाला रक्ताची गरज भासत नाही तो पर्यंत त्यांना रक्ताची गरज कळत नाही. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे हे आव्हान श्री शारिक शेख यांनी या दरम्यान केले.

श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा राजुराचे प्रबंधक श्री राहुल साव तसेच गोल्ड लोनचे प्रबंधक श्री जय रामटेके, टूवीलरचे प्रबंधक श्री गणेश कोलते, अतुल नवघरे, नितीन चौधरी, सचिन टोंगे, सुनील रामटेके , श्रावण सर, दीपक मेघरवार, राहुल वाटगुरे, कबीर घोनमडे, निखिल कोहपरे, चंदु मांडवकर, विशाल सूर्तिकर, अमन शर्मा यांनी सुद्धा रक्तदान करून आपले मोलाचे योगदान दिले तसेच शाखे मधील सर्व कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबीर मध्ये आपले मोलाचे योगदान दिले. या शिबीरमध्ये शाखेच्या व्यतिरिक्त अर्जुन चौधरी, अमोल नेवारे, अमित उरवते, रामबाबु नाईक, शारीक शेख, रमेश कोयलवार, साजिद खान, नरेश रासकोंडा, सोहेल खान पठाण, साबिक शेख, या सर्वांनी रक्तदान करून आपले मोलाचे योगदान दिले. त्यानंतर नागपूर येथील साईनाथ ब्लड बँक यांनी ब्लड कलेक्शन करून  सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)