माझ्याकडे बंदूक; मद्यपीचा स्कूलमध्ये धिंगाणा #chandrapur #ballarpur

Bhairav Diwase
बल्लारपूर:- एका अज्ञात इसमाने बामणी येथील मोंटफोर्ट स्कूलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन सुरक्षारक्षकाला धमकावून धिंगाणा घातल्याची घटना मंगळवारी (दि. ३०) सकाळी उघडकीस आली.

प्राचार्य प्रेम ब्रदर कुठे आहेत, त्यांच्याशी बोलायचे असून माझ्याकडे बंदूकही आहे, असे म्हणत दारूच्या नशेत धिंगाणा घातला आणि थोड्या वेळाने निघून गेला. ही घटना सोमवारी रात्री १०:३०च्या सुमारास घडली. हा इसम दारूच्या नशेत कारमधून आल्याचे समजते.

या घटनेची माहिती सुरक्षारक्षकाने शाळा व्यवस्थापनाला सांगितली. तक्रारीनंतर पोलिसांनी मंगळवारी मोंटफोर्ट स्कूलमधील सीसीटीव्ही तपासले; परंतु काही सुगावा लागला नाही. बल्लारपूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.